Age of marriage of girl: मित्रांनो मुलीच्या लग्नाचे वय सरकारकडून कायद्यानुसार 18 वर्ष ठेवण्यात आले होते. मात्र, विविध आजारांमुळे तसेच बालविवाह रोखण्यासाठी सरकारकडून आता नवीन निर्णय घेण्यात आला आहे. आणि या निर्णयानुसार मुलीचे वय 18 वर्षे नव्हे तर 21 वर्ष ठेवण्यात आले आहे.
याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी 15 ऑगस्ट रोजी केली होती. त्याच बरोबर या गोष्टी नंतर आता मुलगा आणि मुलीचे वय 21 वर्षे करण्यात आले आहे. त्याचबरोबर याबाबतचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार असल्याचे माहिती देखील मिळाली आहे.