Big decision of RBI: मित्रांनो, कोणत्या व्यक्तींचे खाते बंद होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे बघूया..,
बँकेकडून अनेक वेळा ग्राहकांना सांगितले जाते की आपल्या खात्याची केवायसी अपडेट करून घ्या, मात्र अनेक ग्राहक त्यांची केवायसी अपडेट करत नाहीत. यामुळे आता ज्या खात्याची केवायसी अपडेट केली नाही अशा खात्यावर बंदी घालण्यात येणार आहे.
तुम्हाला जर बँकेकडून केवायसी अपडेट करून घ्या असा मेसेज किंवा कॉल येत असेल, किंवा आला असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची केवायसी पूर्ण करून घ्या. अन्यथा तुमचे बँक खाते बंद होऊ शकते.. खाते बंद झाल्यानंतर तुम्हाला पैसे टाकवे येणार नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला बँकेतील पैसे मिळणार नाहीत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे खाते बंद करण्याच्या अगोदर बँकेकडून तुम्हाला सांगण्यात येते. की तुम्ही अशी अशी प्रोसेस पूर्ण केलेली आहे. यामुळे तुमचे खाते बंद केले जाईल. तुम्हाला जर तुमचे खाते पुढे सुरू ठेवायचे असेल तर तुम्ही पुढील दोन दिवसात तुमची केवायसी पूर्ण करून घ्या.