Board Exam 2024: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा कधी सुरू होणार आहे. दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे की नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2024 मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
10 वी 12 वी बोर्ड चे वेळापत्रक येथे क्लिक करून डाऊनलोड करा
बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीत होईल. त्याचबरोबर दहावी ची लेखी परीक्षा एक मार्च ते बावीस मार्च 2024 या कालावधीत होईल. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी 28 ऑगस्ट 2023 रोजी एका परिपत्रकात जाहीर केले आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या सचिव यांनी महाविद्यालय शाळा आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या नियोजनात मदत व्हावी म्हणून लेखी परीक्षेचे संभाव्य वेळ जाहीर केली आहे. यामुळे त्यांच्या अभ्यासक्रमावरील आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होईल.Board Exam 2024
10 वी 12 वी बोर्ड चे वेळापत्रक येथे क्लिक करून डाऊनलोड करा
बोर्डाच्या वेबसाईट वरील संभाव्य वेळापत्रक हे फक्त विद्यार्थ्यांना माहिती देण्यापुरतेच आहे. परंतु जे अंतिम वेळापत्रक आहे. ते तुम्हाला तुमच्या महाविद्यालय, उच्च माध्यमिक शाळा किंवा माध्यमिक शाळा परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांना देण्यात येईल. जे शाळेमार्फत वेळापत्रक दिले जाईल त्याच वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी उपस्थित राहावे.
प्रत्येक परीक्षेच्या आधी जे प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेच्या विविध श्रेणी, तोंडी परीक्षा, इतर विषयांची माहिती बोर्ड शाळा आणि महाविद्यालय यांना देईल या परीक्षेबाबत काही समस्या असल्यास पंधरा दिवसाच्या आत विभागीय मंडळ आणि राज्य मंडळाकडे सादर करणे सचिव यांनी सांगितले आहे की, त्यानंतर केल्यास त्या समस्यावर कोणताही विचार केला जाणार नाही.Board Exam 2024