Dish washing solution: फक्त 5 मिनिटात स्वच्छ होतील जळलेली काळी भांडी, लगेच पहा सोपा उपाय आणि करा घरातील सर्व भांडी नवीकोरी

Dish washing solution:

गरम पाणी:- जळालेले पातले स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गरम पाण्याचा वापर करावा लागणार आहे. तुम्ही जर जळालेल्या भांड्यात गरम पाणी भरून ठेवले तर डाग लगेच निघण्यास मदत करतात. तुम्ही गरम पाणी पंधरा ते वीस मिनिटे झालेले पातेल्यात ठेवू शकता. त्यानंतर प्लास्टिकच्या स्क्रबरने ते भांडे स्वच्छ करा.

तुरटीचा तुकडा:-तुरटीच्या तुकड्याने भांड्यावरचा काळा थर निघण्यास मदत होतो. यासाठी तुम्ही सुरुवातीला भांडी थोडी ओली करा. त्यानंतर तुरटीच्या मदतीने भांडी रगडून स्वच्छ करा. जर तुम्ही यामध्ये मीठ घातलं तरी चालेल

लिंबू:- घराची साफसफाई करण्यासाठी लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर तुम्ही या लिंबाचा वापर भांडी धुण्यासाठी देखील करू शकता. लिंबाचा वापर भांडी धुण्यासाठी कसा करायचा. याबद्दल माहिती पाहूयात. लिंबाचे साल तुम्ही जळालेल्या भांड्यात टाका त्यानंतर गरम पाणी त्यामध्ये टाका आणि 7 ते 8 मिनिटे पाणी उकळल्यानंतर हे पाणी वेगळ्या भांड्यामध्ये ठेवा त्यानंतर लिंबाचे साल जळालेल्या भांड्यावर रबडून स्वच्छ करा.

लिंबू आणि मीठ:- लिंबू आणि मीठ या दोन्ही पदार्थाच्या मदतीने तुम्ही भांडी थोड्या वेळात एकदम नवीकोरी करू शकता. यासाठी तुम्हाला परतलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम चाकूचा किंवा घातली चा वापर करून करपटलेला थर बाजूला काढा. त्यानंतर एका वाटीत मीठ, पाणी आणि लिंबाचा रस टाकून मिश्रण तयार करा त्यानंतर त्यावर थोडी तुरडी टाका आणि त्यानंतर तुम्ही जळालेला भाग स्वच्छ करा. अशा रीतीने तुम्ही तुमच्या घरातील कोणती भांडी जळाल्यावर स्वच्छ करू शकता.Dish washing solution

error: Content is protected !!