Increase in onion market price: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!! यावर्षी कांद्याला मिळणार 6000 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव, जाणून घ्या यामागील कारण

Increase in onion market price: कांद्याचे भाव वाढावेत यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारकडून कांदा निर्यात करण्यासाठी 40 टक्के शुल्क आकारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर याचा परिणाम म्हणून आता बाजारात पुन्हा कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. काल अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एपीएमसीमध्ये 5 हजार रुपये एवढा भाव मिळाला होता. त्याचबरोबर सरासरी बाजार भाव देखील 3000 हजार रुपयांच्या पुढे असल्याचे समोर येत आहे.

त्याचबरोबर सध्या मागील उन्हाळी हंगामातील कांदा संपत आलेला आहे. यामुळे बाजार समितीमध्ये आवक देखील कमी कमी प्रमाणात होत आहे. आणि विशेष म्हणजे सध्या नवरात्र आणि पुढील महिन्यात दिवाळी असल्यामुळे कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

यामुळे तज्ञांच्या मध्ये आगामी काळात कांद्याचे भाव 6 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत राहू शकतात. हा अंदाज जर खरा ठरला तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी खूपच गोड होईल.Increase in onion market price

error: Content is protected !!