Lack of sleep leads to weight gain: झोप कमी झाल्यावर वजन वाढते..!! हृदयविकाराचा झटका येतो? जाणून घ्या तज्ज्ञांच्या मते किती तास झोपले पाहिजे

Lack of sleep leads to weight gain: कमी झोप घेतल्यामुळे शरीरावर कोणकोणते परिणाम होतात खालील प्रमाणे संपूर्ण माहिती..,

  • झोपेच्या कमतरतेमुळे आपण फक्त आजारांना निमंत्रण देत नसून, वजन वाढण्यासाठी देखील कारण देतो.
  • आपण जर पुरेशी झोप घेतली नाही तर आपल्याला इन्सुलिन रजिस्टन्स आणि ग्लुकोज इंटॉलरेंस यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आणि याच कारणामुळे आपल्याला मधुमेह देखील होऊ शकतो.
  • अर्धवट झोपेमुळे आपल्याला मधुमेहाचा त्रास होतोच. मात्र, आपल्याला जर वजन कमी करायचे असेल तर ते देखील कठीण होऊन बसते.
  • त्याचबरोबर झोपेच्या कमतरतेमुळे आपल्याला स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो.
  • अपुरी झोप झाल्यानंतर आपल्या शरीरातील चयापचय क्रिया मंदावते. आणि यामुळे आपल्याला थकवा जाणवतो, त्याचबरोबर आळस देखील आपल्या शरीरात निर्माण होतो.
  • आपण जर दररोज कमी झोप घेऊ लागलो तर आपल्या शरीरातील हार्मोन असंतुलित होतात यामुळे आपली भूक वाढते आणि याच कारणामुळे आपले वजन वाढू शकते.
  • या सर्व समस्या आपल्याला होऊ नयेत म्हणून आपण दररोज किमान रात्री 8 तास झोपणे खूप गरजेचे असते.
error: Content is protected !!