Land records: चला तर मग शेतकरी मित्रांनो, वडिलोपार्जित जमीन तुमच्या नावावर कशी हस्तांतरित करावी. म्हणजेच तुमच्या नावावर तुमच्या वडिलांची किंवा आजोबांची शेती कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. वडिलोपार्जित जमिनीला नाव देताना अनेक अडचणी येतात. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचा पैसा देखील खूप वाया जातो. त्याच बरोबर त्यांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वया जातो.
मागील शासन निर्णयानुसार, वडिलोपार्जित जमीन मुलीच्या किंवा मुलांच्या नावावर (हस्तांतरित) करायचे असल्यास तुम्हाला तुमच्या जमिनीच्या बाजार मूल्यावर सरकारला मुद्रांक शुल्क द्यावे लागत होते. मात्र आता सरकारने सुधारित शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तुम्हाला फक्त 100 रुपये मुद्रांक भरून जमीन तुमच्या नावावर करता येईल.Land records