Maize Farm Management: नमस्कार मित्रांनो, सध्या खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आली आहेत. त्याचबरोबर पुढील काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होईल. या रब्बी हंगामामध्ये गहू या प्रमुख पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्याचबरोबर मक्याची देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लागवड केली जाते. चला तर मग यावर्षी मक्याची कोणती जात शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न देईल याबद्दल माहिती पाहूयात.
मक्याच्या सर्वोत्तम सुधारित जाती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
माहितीनुसार, मका हे खरीप हंगामातील पीक असते. मात्र, मक्याची रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करतात. यामुळे यावर्षीही मक्याची लागवड केली जाणार आहे. मात्र रब्बी हंगामासाठी मक्याच्या कोणत्या वाणाची लागवड करावी याबद्दलची माहिती अनेक शेतकऱ्यांना नसते. चला तर मग याबद्दल आपण माहिती पाहूया.
मक्याच्या सुधारित जाती कोणकोणत्या आहेत? त्याचबरोबर या जातीची लागवडीपासून काढणीपर्यंत कालावधी किती लागतो? कोणत्या जातीपासून एकरी किती उत्पन्न निघेल याबद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.Maize Farm Management
मक्याच्या सर्वोत्तम सुधारित जाती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Advanta PAC 741- रब्बी हंगामात या वाणाची लागवड करून शेतकरी चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतात. या जातीपासून एकरी 40 ते 50 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते. त्याचबरोबर पेरणीनंतर फक्त 120 दिवसांनी मका काढण्यासाठी येते. या जातीसाठी थोडे जास्त पाणी लागते. आणि त्याचबरोबर या वाहनापासून निघणाऱ्या मक्याचा चारा देखील चांगल्या प्रमाणेच असतो.
Pioneer P3524- रब्बी हंगामात या वाहनाची लागवड करून शेतकरी 40 ते 50 एकरी उत्पन्न घेऊ शकतात. या वाणाचे पिक देखील शेतकरी फक्त 120 दिवसात काढू शकतात. या वाणाची लागवड केल्यानंतर सर्वात मोठा फायदा म्हणजे या वानांवर लष्करी अळीचे प्रमाण कमी असते. यामुळे हे वाण लावून शेतकरी चांगल्या प्रमाणात नफा मिळू शकतात.
Syngenta NK 6240 Plus- मक्याचा हा एक सुधारित वाणाचा प्रकार आहे. त्याचबरोबर या वाणापासून शेतकरी जवळपास 50 क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न सहज घेऊ शकतात. त्याचबरोबर या वाणाची काढणी देखील 120 दिवसात येते.Maize Farm Management