Remedies for Whitening Teeth: दातांवर असलेला पिवळा स्थळ नष्ट करण्यासाठी खालील उपाय करा
- दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर करू शकता. यामुळे प्लाक आणि बॅक्टेरिया दूर होण्यास मदत होतील. या 2 द्रावणांची पेस्ट बनवण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचे हायड्रोजन पेरॉक्साईड मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट ब्रशला लावून दात व्यवस्थित स्वच्छ करा.
- त्याचबरोबर तुम्ही दात स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचाही वापर करू शकता. यामध्ये तुम्ही 2 चमचे एप्पल सायडर व्हिनेगर घ्या आणि हे 1 कप पाण्यात मिसळून माऊथ वॉश तयार करा. त्यानंतर हे मिश्रण तोंडात 30 सेकंद फिरवा आणि त्यानंतर पाण्याने गुळण्या करा आणि त्यानंतर व्यवस्थित ब्रश करा. या मिश्रणाचा जास्त वापर करू नका अन्यथा दातांचे नुकसान होऊ शकते.
- तिसरा पर्याय म्हणजेच लिंबू, संत्री आणि केळ्याची साल. या पदार्थांची साल दातांवर रगडल्यास तुमच्या दाताचा पिवळेपणा दूर होऊ शकतो आणि तुमचे दात पांढरे आणि चमकदार दिसतील.Remedies for Whitening Teeth